नियम व अटी
सेवेचे स्वरूप
आम्ही अधिकृत शासकीय व इतर ऑनलाइन पोर्टलवर अर्ज करण्यासाठी सहाय्य करतो. दाखले, मंजुरी व लाभ देण्याचा अंतिम निर्णय संबंधित प्राधिकरणाचा असतो; त्याची हमी आम्ही देऊ शकत नाही.
आपली जबाबदारी
आपण दिलेली माहिती व कागदपत्रे खरी, अचूक आणि आपल्या मालकीची किंवा वापराचा अधिकार असलेली असावीत. चुकीच्या माहितीमुळे अर्ज नाकारला गेल्यास त्याची जबाबदारी अर्जदाराची राहील.
शुल्क
शासकीय शुल्क प्राधिकरणाने जाहीर केल्याप्रमाणे लागू होते. आमचे सेवा शुल्क सेवेच्या पानावर दिले असल्यास ते लागू होते, अन्यथा अर्ज करण्यापूर्वी आपल्याला कळवले जाते.
प्रक्रिया कालावधी
प्रक्रियेचा कालावधी संबंधित विभागावर अवलंबून असतो. दिलेला कालावधी फक्त अंदाज आहे.
खाते
आपला पासवर्ड गोपनीय ठेवा. खात्याचा गैरवापर होत असल्याचा संशय असल्यास त्वरित केंद्राशी संपर्क साधा.